Massive Explosion in Italy : मिलानमध्ये मोठा स्फोट! 4 जणांचा मृत्यू; अनेक गाड्या जळून खाक | पुढारी

Massive Explosion in Italy : मिलानमध्ये मोठा स्फोट! 4 जणांचा मृत्यू; अनेक गाड्या जळून खाक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Massive Explosion in Italy : उत्तर इटलीतील मिलान शहराच्या मध्यभागी मोठा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर रस्त्यावरील अनेक वाहनांना आग लागली. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्फोट इतका भीषण होता की धुराचे लोट दूरवर दिसत होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

इटालियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्सिजन टँकची वाहतूक करणा-या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. दहशतवादी हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याच वेळी, ब्रिटनच्या स्थानिक मीडियाने सांगितले की मिलानच्या मध्यभागी जिथे स्फोट झाला, तिथे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची इमारतही आहे.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरातील इमारतींमधून लोकांना बाहेर काढले आणि सुरक्षीतस्थळी हलवले. सध्या या स्फोटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. स्फोटावेळी अनेक वाहने एकत्र उभी होती. एकामागून एक वाहनांनी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती. आकाशात काळ्या धुराचे लोट पहायला मिळाले.

Back to top button