पुढारी ऑनलाईन: व्यक्तीच्या नियमित आहारात ताकापेक्षा दही हे लोकप्रिय आहे. उत्तम पचन आणि आरोग्यासाठी याचा आहारात समावेश केला जातोच पणआयुर्वेदानुसार, दह्यापेक्षा ताकाला प्राधान्य दिले पाहिजे. कारण ते दह्यापेक्षा आरोग्यदायी असते. दही आणि ताक दोन्ही जवळपास सारख्याच प्रक्रियेने बनलेले असल्याने, अनेक लोकांमध्ये असा संभ्रम असतो, की दही की ताक? (Curd or buttermilk?) यामधील आरोग्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर, हे जाणून घेऊया…
अनेकांना असे वाटते की, दह्यात पाणी घातले की, त्याचे ताक बनते. (Curd or buttermilk?) यातील फरक असा तो काय? पण, दह्यात नुसते पाणी जरी मिक्स केले तरी, त्याच्या गुणधर्मामध्ये बराचसा फरक पडतो. दही आणि ताक वेगळे फायदे मिळतात. दही हे चवीला आंबट आणि पचनानंतर परिणामकारक असते. दही हे जड आणि उष्ण पदार्थ वर्गात येतो. तसेच हा बद्धकोष्ठता निर्माण करणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये कफ, पित्त आणि वात वाढविणारे गुणधर्म असतात. दही मानवी शरीरात लीपिड आणि फॅट वाढवू शकते.
आयुर्वेदानुसार, ताक हे चवीला तुरट-आंबट असते. ताक हे हलके आणि सामर्थ्यशाली असते. ताक हे स्वभावत: वाहक आहे. ताक हे कफ आणि वातदोष शांत करते. तसेच ते ॲसिडिटी, ॲनिमिया, पोटाच्या विकारांसाठी अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे नियमित जेवणामध्ये समावेश करणे आरोग्यदायी (Curd or buttermilk?) ठरते.
दही आणि ताकातील गुणधर्म पाहता, दह्यापेक्षा दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास जिरे-धणे पावडर, पुदिना-कोथिंबीर टाकलेले मसालेदार ताक हे पचनासाठी अधिक फायदेशीर ठरते. तसेच, दररोज एक ग्लास ताक पिणे हे नेहमीच आरोग्यदायी ठरेल असे मत काही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.