Cryptocurrency Prices Today | क्रिफ्टो बाजारात हाहाकार, Bitcoin, Ether सह या क्रिप्टोकरन्सींमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या कारण

Cryptocurrency Prices Today
Cryptocurrency Prices Today

Cryptocurrency Prices Today : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढीच्या शक्यतेने क्रिफ्टो बाजारात हाहाकार उडाला आहे. सोमवारी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) आणि दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी इथर (Ether) घसरली. अमेरिका ते यूरोप पर्यंत आर्थिक धोरणे कडक करण्याच्या आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने व्याज दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम क्रिप्टो बाजारावर दिसून येत आहे.

सिंगापूरमध्ये सकाळच्या सत्रात इथर करन्सी ५.६ टक्क्यांनी घसरून दोन महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहचली. इथर सुमारे १,३०२ डॉलरवर व्यवहार करत आहे. त्यानंतर ही घसरण १० टक्क्यांपर्यंत पोहचली. तर बिटकॉइन सुमारे ५ टक्क्यांनी घसरून १९,००० डॉलरच्या खाली आले आहे. XRP, Avalanche आणि Polkadot सारख्या क्रिप्टोकरन्सींचेही मोठे नुकसान झाले आहे.

जूनच्या मध्यावधी पर्यंत इथर करन्सी तेजीत होती. इथर करन्सी या कालावधीत १,७०० डॉलर पर्यंत पोहोचली होती. पण आता या करन्सीची तेजी संपली आहे. गुंतवणूकदारांना फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीबाबत होणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. याचा परिणाम क्रिप्टोकरन्सींच्या किमतीवर दिसून येत आहे.

बिटकॉइन १८,८३० डॉलरवर व्यवहार करत आहे. ही करन्सी त्यांच्या १९,००० डॉलर पातळीवरून खाली आली आहे. यामुळे जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप (बाजार मूल्यू) १ ट्रिलियन डॉलरच्या खाली आले आहे. गेल्या २४ तासांत जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप ९७४ अब्ज डॉलर एवढे होते. त्यात ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

dogecoin या cryptocurrency मध्ये ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. शिबा इनू (Shiba Inu) ९ टक्क्यांनी खाली आली आहे. एकूणचं सर्व क्रिप्टोकरन्सींचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. (Cryptocurrency Prices Today)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news