पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय राखीव पोलीस दल ( सीआरपीएफ )मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार CRPF crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर ४ जानेवारी २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. ( CRPF Recruitment 2023 )
या भरती मोहिमेत एकूण १४५८ पदे भरण्यात येणार आहेत. १४५८ पदांपैकी १४३ जागा सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि १३१५ जागा हेड कॉन्स्टेबल पदासाठी आहेत.
या भरतीसाठी 25 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारला जाईल. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना 'सीआरपीएफ'च्या http://www.crpfindia.com आणि www.crpf.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
हेही वाचा :