पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Ronaldo Georgina ) अल नासर क्लबमध्ये
(al nassr club) दाखल झाला आहे. सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत दाखल झाला आहे. मात्र त्याच्या या कृतीमुळे तिथल्या नियमांची पायमल्ली होत आहे. जाणून घेवूया, नेमके हे प्रकरण काय आहे याविषयी…
मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि युव्हेंटस येथे प्रभावी कामगिरी केल्यानंतर, ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबियातील अल नासर या फुटबॉल क्लबसोबत करार केला. या नव्या करारामुळे क्लबकडून त्याला १ हजार ७७५ कोटी मिळणार आहेत. हा करार 2025 पर्यंत आहे. रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नासरचा संघ मजबूत होईल, असे मानले जात आहे.
रोनाल्डो आता गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत सौदीत दाखल झाला आहे. हे दोघे लिव्ह-इन रिलिशनशीपमध्ये आहेत; परंतू सौदी अरेबियात लिव्ह -इनमध्ये राहणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणती कारवाई होणार याची चर्चा सुरु झाली होती.
सौदीमधील अधिकार्यांना या प्रकरणी म्हटलं आहे की, "रोनाल्डोवर कारवाई करता येणार नाही. कारण रोनाल्डो आणि जॉर्जिया यांचे २०१६ पासून संबंध आहेत. हे दोघे मागील सहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलिशनशीपमध्ये आहेत. त्यांना दोन मुलेही आहेत. सौदी अरेबियात विदेशी नागरिकांसाठी लिव्ह-इन रिलिशनशीपमधील कटेकोर अंमलबजावणी थोडी शिथिल झाली आहे. जर विदेशातील नागरिकाकडून मोठा गुन्हा घडला तर याचा विचार होतो. सौदी अरेबिया परदेशी नागरिकांबाबत फारसा हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे रोनाल्डो याला अप्रत्यक्षपणे आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहण्याची परवानगी मिळेल. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही."
हेही वाचा :