पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चाहत्याला दिलेली वागणूक चांगलीच भोवली आहे. चाहत्याबरोबर अयोग्य वर्तनाबद्दल फुटबॉल असोसिएशन (एफए) ने त्याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्याला ५० हजार युरोचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, दोन सामन्यांसाठी निलंबन हे सध्या कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकावेळी असणार नाही. तर क्लबच्या सामन्यावेळी याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे 'एफए'ने स्पष्ट केले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कतारमध्ये 2022 फिफा विश्वचषक खेळत आहे. आज पोर्तुगालचा सामना हा घानाविरुद्ध आहे.
९ एप्रिल २०२२ रोजी गुडिसन पार्क येथे एव्हर्टन विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चाहत्यांबरोबर वादावादीचा प्रकार घडला होता. या वेळी रोनाल्डोनॆ चाहत्याच्या हातून मोबाईल फोन हिसकावून त्याच्याकडे भिरकावला होता. रोनाल्डोचे
चाहत्याबरोबरील वर्तन अयोग्य होते, असा आरोप फुटबॉल असोसिएशनने केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती
स्थापन करण्यात आली. या समितीनेही रोनाल्डोचे वर्तन अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. त्याला दोन सामन्यांवर बंदी घालत ५० हजार युरोचा आर्थिक दंडही केला आहे.
वादावादीच्या घटनेनंतर रोनाल्डो याने इंस्टाग्रामवर माफी मागितली होती. त्यानं म्हटलं होते, "कठीण क्षणांचा सामना करत असताना भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे नसते. मात्र फुलबॉल सारख्या खेळात आपण तरुणांसमोर नेहमीच संयमी वर्तनाचा आदर्श ठेवला पहिजे. मी झालेल्या प्रकारबद्दल माफी मागतो. मी संबंधित चाहत्याला ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळ पाहण्यासाठी निमंत्रणे देतो".
सामन्यानंतर चाहत्याबरोबर झालेले वर्तन चुकीचे होते, हा आरोप रोनाल्डोने स्वीकारला; परंतू दोन सामन्यांसाठी निलंबण नको, अशी मागणी त्याने केली होती. मात्र चौकशी समितीने त्याची मागणी फेटाळत त्याचे वर्तन अयोग्य असल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा :