Crime News : तामिळनाडूत हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

Crime News : तामिळनाडूत हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्याची निर्घृण हत्या
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील मदुराई शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे नेते यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मणिकंदन (वय ४१ वर्ष), असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते हिंदू मक्कल काची या संघटनेचे पदाधिकारी होते. ही घटना ३१ जानेवारीसा घडली असून आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पुढील तपास सुरु आहे.(Crime News)
माहितीनुसार, मणिकंदन हिंदू मक्कल काची दक्षिण मदुराईचे उपसचिव होते. ते मदुराईच्या एमके नगरमध्ये दागिन्यांचे दुकान चालवत होते. मंगळवारी (दि.३१) रात्री ते दुकान बंद करून घरी परतत होते. दरम्यान, काही लोकांच्या टोळक्याने त्यांच्यावर मागून चाकू, विळा, दगडाने हल्ला केला. अमानुष मारहाण केल्यानंतर आरोपींनी मणिकंदनला जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर मणिकंदन यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मदुराईच्या जयहिंदपुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या हत्येमागे राजकीय किंवा वैयक्तिक वैमनस्य आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news