Virat and Rohit : विराटच्‍या १०० व्‍या कसोटीवर रोहित शर्मा म्‍हणाला, “विराटने केलेल्‍या बदलामुळे टीम इंडियाला मिळाले यश”

Virat and Rohit : विराटच्‍या १०० व्‍या कसोटीवर रोहित शर्मा म्‍हणाला, “विराटने केलेल्‍या बदलामुळे टीम इंडियाला मिळाले यश”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
भारत आणि श्रीलंकामध्‍ये शुक्रवारपासून ( दि. ४ ) कसोटी सामना सुरु होत आहे. विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी होणार्‍या या मालिकेत टीम इंडिया दोन सामने खेळणार आहे. श्रीलंकेची संघही विश्‍वचषक स्‍पर्धेतील आपले स्‍थान सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करताना दिसेल. भारतसाठी ही कसोटी विशेष आहे. ( Virat and Rohit ) कारण या कसोटीत प्रथमच रोहित शर्मा हा कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली हा आपल्‍या कारकीर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्‍यापूर्वी रोहित शर्मा याने माध्‍यमांशी संवाद साधला. यावेळी त्‍याने विराट कोहलीबाबत महत्त्‍वपूर्ण विधान केले.

Virat and Rohit : विराटने केले अनेक बदल

यावेळी रोहित शर्मा म्‍हणाला, " विराट कोहली हा आपल्‍या कारकीर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळत आहे. हा एक दिमाखदार आणि मोठा प्रवास राहिला आहे. त्‍याने टीम इंडियासाठी अनेक उत्‍कृष्‍ट खेळी केल्‍या आहेत. त्‍याने केलेल्‍या बदलामुळे टीम इंडियाला यश मिळाले. त्‍याच्‍या आजवरचा प्रवास हा विशेष आहे.

रोहितने सांगितली विराटची सर्वात आवडती खेळी

यावेळी रोहितने विराटची आजवरची सर्वात आवडती खेळीबाबत सांगितले. तो म्‍हणाला, " मला विराटच्‍या उत्‍कृष्‍टखेळी ही २०१३मधील दक्षिण आफ्रिकेमधील खेळी वाटते. एक आव्‍हानात्‍मक खेळपट्‍टीवर प्रथम खेळताना त्‍याने उत्‍कृष्‍ट प्रदर्शन करत शतक झळकावले. माझ्‍यासाठी ही विराटची आजवरची सर्वात उत्‍कृष्‍ट खेळी आहे.

सामना जिंकणे हेच ध्‍येय

यावेळी कसोटी संघाचा कर्णधार म्‍हणून तुझे ध्‍येय कोणते?, या प्रश्‍नावर रोहित म्‍हणाला, " मी प्रामाणिकपणे सांगतो की, माझ्‍याकडे जो संघ आहे त्‍याला बरोबर घेवून सामना जिंकणे हेच माझे ध्‍येय आहे. आमच्‍या संघाने मागील पाच वर्ष उत्‍कृष्‍ट प्रदर्शन केले आहे. याचे बहुतांश श्रेय हे विराट कोहलीला जाते".

श्रीलंकेविरुद्‍धच्‍या कसोटी सामन्‍यात पुजारा आणि राहणे यांना संधी देण्‍यात आलेली नाही. त्‍यांच्‍याऐवजी युवा खेळाडूंना संधी मिळण्‍याची संधी आहे. जेव्‍हा संघात बदल होतो ती नवी सुरुवात असते. पुजारा आणि रहाणेच्‍या जागी खेळणार्‍या खेळाडूंनी देशातंर्गत स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट प्रदर्शन केले आहे. आपण सर्वांनी त्‍यांचे स्‍वागत करायला हवे, असेही रोहितने यावेळी सांगितले.

सध्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत पाचव्‍या स्‍थानी आहे. ही एक आव्‍हानात्‍मक स्‍पर्धा आहे. सध्‍या आम्‍ही मध्‍यस्‍थानी आहोत. त्‍यामुळे यापुढे विश्‍वचषक स्‍पर्धेतील प्रत्‍येक सामना आमच्‍यासाठी महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे वर्तमानामधील कामगिरी उत्‍कृष्‍ट करण्‍यावर आमचा भर आहे. आता आम्‍ही ९ कसोटी सामने खेळणार असून प्रत्‍येक सामन्‍यात आम्‍हाला जिंकावा लागणार आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news