COVID19 | देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली; २४ तासांत ३,६८८ नवे रुग्ण, ५० मृत्यू

COVID19 | देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली; २४ तासांत ३,६८८ नवे रुग्ण, ५० मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित (COVID19) आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत ३,६८८ नवे रुग्ण आढळून आले. तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,७५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १८,६८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ५ लाख २३ हजार ८०३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

याआधी गुरूवारी दिवसभरात ३ हजार ३७७ कोरोनाबाधित आढळले होते. तर, ६० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ हजार ४९६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.७१ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८८ कोटी ८९ लाख ९० हजार ९३५ डोस देण्यात आले आहेत. यातील २.८२ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ७७ लाख ४२ हजार ६९५ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी २८ लाख ९० हजार ९६५ डोस पैकी १९ कोटी ५८ लाख ७४ हजार २९० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.भारतात आतापर्यंत ८३ कोटी ६९ लाख ४५ हजार ३८३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ७३ हजार ६३५ तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीमएआरकडून देण्यात आली आहे.

मुंबईत ९३ नवे रुग्ण

मुंबईत काल शुक्रवारी (दि.२९) कोरोनाचे नवे ९३ रुग्ण आढळून आले. तर ६८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ५८७ वर पोहोचली आहे. इथला कोरोनावाढीचा दर (२२ एप्रिल-२८ एप्रिल ) ०.००७ टक्के असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट वाढला

दिल्लीत कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. काल (दि.२९) एका दिवसात दिल्लीत कोरोनाचे १,६०७ नवे रुग्ण आढळून आले होते. यामुळे येथील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५,६०९ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट ५.२८ टक्क्यांवर गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news