COVID-19 Update: कोरोना रूग्णसंख्येत घट; २४ तासांत ७,६३३ रूग्णांची नोंद

Covid-19 India Updates
Covid-19 India Updates

पुढारी ऑनलाईन: देशभरातील रूग्णसंख्येतील घट सातत्याने सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ७६३३ कोरोना रूग्णांची नोंद (COVID-19 Update) करण्यात आली असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. देशभरात ६१ हजार,२३३ कोरोना रूग्ण सक्रिय आहेत. तर आत्तापर्यंत ६७०२ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत देशभरात एकूण ९४.४३ कोटी कोरोना टेस्ट (COVID-19 Update) करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात २,११,०२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कालच्या अपडेटनुसार ९१११ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. काल सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ही ६० हजार ३१३ इतकी झाली होती, अशी माहिती केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

आत्तापर्यंत राबवण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत (COVID-19 Update) एकूण एकूण २२०.६६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्या कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ९५.२१ कोटी आहे, तर २२.८७ कोटी लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news