Stock Market Opening | शेअर बाजार सपाट, इन्फोसिस शेअर घसरणीला ब्रेक | पुढारी

Stock Market Opening | शेअर बाजार सपाट, इन्फोसिस शेअर घसरणीला ब्रेक

Stock Market Opening : सोमवारच्या घसरणीनंतर आज मंगळवारी शेअर बाजार सपाट झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून पुन्हा ६० हजारांवर पोहोचला. तर निफ्टी १७,७०० वर खुला झाला. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर आले. इन्फोसिसचा शेअर आज सावरताना दिसत आहे. हा शेअर हिरव्या चिन्हात खुला झाला असून तो १,२६६ रुपयांवर व्यवहार करत आहे. काल हा शेअर १२ टक्क्यांनी घसरला होता.

सुरुवातीला येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, टाटा स्टील, सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे शेअर्स वाढले होते. एकूणच शेअर बाजाराची आजची स्थिती सपाट दिसत आहे. काल सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल ९५० अंकांपर्यंत घसरला होता. यामुळे गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटींचे नुकसान झाले होते. मुख्यतः आयटी स्टॉक्स गडगडले होते.

हे ही वाचा :

Back to top button