दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासांत ६,५९४ रुग्णांची नोंद

कोरोना रूग्‍णसंख्या
कोरोना रूग्‍णसंख्या
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६,५९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात ५०,५४८ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ४,०३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ६१ हजार ३७० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मंगळवारचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.०५ टक्के तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३२ टक्के एवढा होता.

रविवारी दिवसभरात ८ हजार ८४ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. तर, १० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ४ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६८ टक्क्यांवर घसरला. तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ३.२४ टक्के आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.२१ टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३ लाख २१ हजार ८७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९५ कोटी ३५ लाख ७० हजार ३६० डोस देण्यात आले आहेत. यातील ३.५२ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ८९ लाख ३५ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १३ कोटी ८१ लाख ४८ हजार ९६५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८५ कोटी ५१ लाख ८ हजार ८७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २ लाख ४९ हजार ४१८ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

दिवसनिहाय कोरोनाबाधितांची वाढती संख्या

दिनांक दैनंदिन कोरोनाग्रस्त

१) ७ जून ३,७१४
२) ८ जून ५,२३३
३) ९ जून ७,२४०
४) १० जून ७,५८४
५) ११ जून ८,३२९
६) १२ जून ८,५८२
७) १३ जून ८,०८४
८) १४ जून ६,५९४

मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या अकरा हजारांवर पोहचली आहे. दररोज हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या शंभराच्या घरात पोहचल्यामुळे सुमारे ५०० पेक्षा जास्त रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यातील सुमारे २० ते २२ जण ऑक्सिजनवर आहेत. मुंबई शहर व उपनगरांत कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला होता. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही दोनशेच्या खाली आली होती. मात्र पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढू लागला. सध्या मुंबईत अकरा हजारांपर्यंत सक्रिय रुग्णांचीसंख्या पोहोचली असून हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news