संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हे विभागाकडे द्यावे : महेश तपासे

संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हे विभागाकडे द्यावे : महेश तपासे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. दरम्यान अशा भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणार्‍या मंत्र्यांला पाठीशी घालणार की त्याची मंत्री पदावरून हकालपट्टी करणार हे जनतेसमोर जाहीर करावे. अशीही मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news