नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 14 हजार 917 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून आज (दि.१५) देण्यात आली. याच कालावधीत 32 लोकांचा बळी गेला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या आता 4 कोटी 42 लाख 68 हजार 381 वर आणि मृतांची संख्या 5 लाख 27 हजार 69 वर गेली आहे.
गेल्या चोवीस तासात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 508 पर्यंत वाढली आहे. कोरोनाचा दैनिक संक्रमण दर 7.52 टक्के इतका असून साप्ताहिक संक्रमण दर 4.65 टक्के इतका आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.27 टक्के इतकी आहे तर रिकव्हरी दर 98.54 टक्के इतकी आहे.
चोवीस तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 647 ने वाढ झाली आहे. बरे होणाऱ्या एकूण लोकांची संख्यादेखील लक्षणीय असून ही संख्या आता 4 कोटी 36 लाख 23 हजार 804 इतकी आहे. बाधितांच्या तुलनेत मृतांची टक्केवारी 1.19 टक्के इतकी आहे. दरम्यान आतापर्यंत 208.25 कोटी डोसेस लोकांना देण्यात आले आहेत, असेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचलंत का?