वीजपुरवठ्याच्या व्यवहारात प्रत्येक महिन्याला ग्राहकास 30 दिवस वीजपुरवठा केल्यानंतर महिन्याच्या वीजवापर युनिटमध्ये नोंदविला जातो. महिनाभर वापरलेले विजेचे युनिट गुणिले त्यासाठी आयोगाने निश्चित केलेला दर असा गुणाकार करून स्थिर आकार, विद्युत शुल्क, यासह इतर आकारासह ग्राहकांना वीजबिल दिले जाते. त्यामध्ये सुमारे सात ते आठ दिवस लागतात. ग्राहकांच्या हातात जे वीजबिल पडते, ती रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना 15 दिवसांची मुदत दिलेली असते. म्हणजे वीज वापरल्याचे 30 दिवस, वीजबिल तयार करण्याचे सात दिवस आणि रक्कम भरण्यासाठी 15 दिवस असे साधारपणे 52 दिवस महावितरण कंपनी रक्कम वसूल न करता ग्राहकांना वीजपुरवठा करीत असते.