Consumer Forum : सहलीवेळी ओलाच्‍या कॅबमधील ‘एसी’ बंद, ग्राहकाला १५ हजार रुपयांची भरपाई देण्‍याचे निर्देश

Consumer Forum : सहलीवेळी ओलाच्‍या कॅबमधील ‘एसी’ बंद, ग्राहकाला १५ हजार रुपयांची भरपाई देण्‍याचे निर्देश
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सहलीवेळी कॅबमधील वातानुकुलीत सेवा ( एसी) बंद राहिली. यामुळे ओला कंपनीने ग्राहकाला १५ हजार रुपयांची भरपाई द्‍यावी, असे निर्देश नुकतेच बंगळूर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ( Consumer Forum ) दिले आहेत. कंपनीमुळे तक्रारदाराला संपूर्ण सहलीमध्‍ये मानसिक त्रास सहन करावा लागला. आश्‍वासनानुसार सेवा प्रदान करणे कंपनीचे कर्तव्‍य आहे, असे निरीक्षणही ग्राहक आयोगाने या वेळी नोंदवले.

भरपाईची मागणी कंपनीने फेटाळली

ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये एका ग्राहकाने ८ तासांच्‍या सहलीसाठी ओला कॅब बूक केली. या आठ तासांच्‍या प्रवासात कॅबमध्‍ये वातानुकुलीत सेवा बंद होती. यासंदर्भात तक्रारीचे निवारण करण्‍यासाठी कंपनीची कोणतीही यंत्रणा उपलब्‍ध नव्‍हती.  या गैरसोयीबद्दल ग्राहकाने कंपनीशी संपर्क साधत पैसे परत करण्‍याची मागणी केली. कंपनीने सांगितले की, एसीसाठी कंपनी कोणतेही अतिरिक्‍त शुल्‍क आकारत नाही. त्‍यामुळे बुकिंगचे पैसे देण्‍याचा प्रश्‍न निर्माण होत नाही.

Consumer Forum : ग्राहकाने हेल्‍पलाईनच्‍या माध्‍यमातून नोंदवली तक्रार

या प्रकरणी तक्रारदाराने राष्‍ट्रीय ग्राहक हेल्‍पलाईनच्‍या माध्‍यमातून आपली तक्रार नोंदवली. प्रवासात झालेल्‍या मानसिक  त्रासाबद्दल ओला कंपनीकडे ५० हजार रुपयांची भरपाई आणि बुकिंगची १ हजार ८३७ रुपये रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची मागणी केली होती. बंगळूर येथील जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्‍पष्‍ट केले की, "ग्राहकांना दिलेल्‍या आश्‍वासनानुसार सेवा प्रदान करणे कंपनीचे कर्तव्‍यच आहे. कंपनीमुळे ग्राहकाला संपूर्ण सहलीमध्ये मानसिक त्रास सहन करावा लागला. प्रवासावेळी कॅबमधील वातानुकुलीत सेवा ( एसी) नादुरुस्‍त असल्‍याने बंद राहिला. यामुळे ओला  कंपनीने संबंधित तक्रारदाराला १० हजार रुपये नुकसाभरपाई आणि पाच हजार रुपये खटल्‍याचा खर्च अशी १५ हजार रुपयांची भरपाई द्यावी."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news