CWC : सोनिया गांधी यांनी पक्षातील नाराज नेत्‍यांना खडसावले

CWC : सोनिया गांधी यांनी पक्षातील नाराज नेत्‍यांना खडसावले
Published on
Updated on

बहुचर्चित काँग्रेस वर्किंग कमिटीची (CWC)  बैठक आज सुरु झाली आहे. बैठक सुरु होताच 'तुम्‍ही थेट माध्‍यमांशी बोलण्‍याऐवजी माझ्‍याशी बोला', अशा शब्‍दात काँग्रेसच्‍या हंगामी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी नाराज नेत्‍यांना खडसावले. दरम्‍यान, या बैठकीत पक्षाच्‍या कायमस्‍वरुपी अध्‍यक्षपदाचा मुद्‍यांवर चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे. मागील दीड वर्ष कोरोना महामारीमुळे अध्‍यक्षपदासंदर्भात निर्णय झालेला नाही.

मीच पक्षाची अध्‍यक्ष

मीच पक्षाची कायमस्‍वरुपी अध्‍यक्ष आहे. त्‍यामुळे माध्‍यमांना माहिती देवून माझ्‍यापर्यंत निरोप पोहचविण्‍याची गरज नाही. तुम्‍ही थेट माझ्‍याशी संपर्क करा, असे सोनिया गांधी यांनी नाराज नेत्‍यांना सुनावले. तसेच पक्षातंर्गत मतभेद दूर करावे लागतील तरच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले परिणाम दिसतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जी-२३ नेत्‍यांचा सूर बदलला

काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बैठकीच्‍या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी जी-२३ नेत्‍यांना फटकारले. त्‍यामुळे यावेळी या नेत्‍यांचा सूरच बदलला. पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते गुलाम नबी आझाद म्‍हणाले की, आमचा सोनिया गांधी यांच्‍यावर पूर्ण विश्‍वास आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वावर कोणीही प्रश्‍न उपस्‍थित करु शकत नाही.

ज्‍येष्‍ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी 'सीडब्ल्यूसी' ( CWC) बैठक घेण्‍यात यावी, पक्षाला कायमस्‍वरुपी अध्‍यक्ष असावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून पक्षातील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांकडून होत आहे. जी-२३ चे सदस्‍य आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी 'सीडब्ल्यूसी' बैठक घेण्‍यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांच्‍याकडे पत्राव्‍दारे केली होती.

ज्‍येष्‍ठ नेते कपिल सिब्‍बल यांनी म्‍हटलं होते की, आमच्‍या पक्षाला अध्‍यक्ष नाही. या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिब्‍बल यांच्‍या घराबाहेर जोरदार निदर्शने केली होती. पक्षाने सिब्‍बल यांची ओळख निर्माण केली आहे. त्‍यांनी अशा प्रकारे पक्षाचा अवमान करु नये, असे पक्षाचे महासचिव अजय माकन यांनी म्‍हटलं होतं.

CWC : बैठकीत पक्षाध्‍यक्ष पदावर चर्चा होण्‍याची शक्‍यता

आज बैठकीत अध्‍यक्षपदावर चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे. पुढील वर्षी पाच राज्‍यांमध्‍ये निवडणुका होणार आहेत. त्‍यामुळे पक्षातंर्गत निवडणुका या लांबणीवर पडतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटीच्‍या ( सीडब्ल्यूसी ) बैठकीतच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news