‘या विश्वासघातकांना  समजत नाही …’ : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्‍यावर जयराम रमेश भडकले

जयराम रमेश ( संग्रहित छायाचित्र )
जयराम रमेश ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जेव्हा मित्र राजकीय पक्ष सोडतात तेव्‍हा त्‍यांना जाणीव नसते की, त्यांना खूप काही दिले आहे, कदाचित त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त; पण जे कमकुवत आहेत. त्यांच्यासाठी हे 'वॉशिंग मशीन' नेहमीच वैचारिक बांधिलकी किंवा वैयक्तिक निष्ठेपेक्षा अधिक आकर्षक ठरते. या विश्वासघातकांना  समजत नाही की, त्याच्या जाण्याने लोकांसाठी नवीन मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी उघडतील, अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अशोक चव्‍हाणांच्‍या राजीनाम्‍यावर ( Ashok Chavan Resign ) अप्रत्‍यक्ष भाष्‍य केले. ( Congress' swipe at Ashok Chavan after he quits party )

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी आज पक्षाचे प्राथमिक सदस्‍यत्‍व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

यानंतर आपल्‍या आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्‍या पोस्टमध्‍ये जयराम रमेश यांनी म्‍हटले आहे की, " जेव्हा मित्र आणि सहयोगी राजकीय पक्ष तुमची साथ सोडतात ज्‍यांना खूप काही दिले आहे. कदाचित त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त दिले गेले आहे. दुःख होते; परंतु ज्यांना असुरक्षिततेने ग्रासले आहे त्यांच्यासाठी ते विशिष्ट वॉशिंग मशीन नेहमीच वैचारिक बांधिलकी किंवा वैयक्तिक निष्ठेपेक्षा अधिक आकर्षक ठरते. या विश्वासघातकांना हे समजत नाही की, त्याच्या जाण्याने लोकांसाठी नवीन मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. असे लोक गेल्‍याने नवीन लोकांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी तयार होणार आहेत. ( Congress' swipe at Ashok Chavan after he quits party )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news