राज्यसभा निवडणूक : काँग्रेसच्या ‘प्रतापी’ निर्णयाने शिवसेना अडचणीत

 काँग्रेस राज्यसभा उमेदवार :  इम्रान प्रतापगढी
काँग्रेस राज्यसभा उमेदवार : इम्रान प्रतापगढी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेस हायकमांडने राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी आहे. ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसने आपली सगळी ४४ मते प्रतापगढी यांना देण्याचा निर्णय मतदानाच्या अखेरच्या क्षणी घेतला आहे.

काँग्रेसकडे ४४ मते असून, यातील २ मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत तसे ठरले होते. निवडून येण्यासाठी आता ४१ पहिल्या पसंतीची मते गरजेची आहेत. पण कोणताही धोका होऊ नये, यासाठी काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना प्रतापगढी यांना मते देण्यास सांगितले आहे. यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांची दोन मते कमी होणार असल्याने, शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा असणार आहे.

चार राज्यांच्या 16 राज्यसभेच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या 16 जागांसाठी सध्या काटेकी टक्कर रंगताना दिसत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news