Congress Files | अबब! काँग्रेस काळात ‘इतका’ मोठा घोटाळा; भाजपकडून ‘काँग्रेस फाईल्स’ व्हिडिओ रिलीज

Congress Files | अबब! काँग्रेस काळात ‘इतका’ मोठा घोटाळा; भाजपकडून ‘काँग्रेस फाईल्स’ व्हिडिओ रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सर्वाधिक काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता. काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली होती. २०१४ मध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीची पोलखोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला सत्तेवर बसवले. दरम्यान, काँग्रेसच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर भाजपने आरोप करत 'काँग्रेस फाईल्स' (Congress Files)  नावाचा एक व्हिडिओ तयार केला आहे. भाजपने आज (दि.२) या व्हिडिओ मालिकेचा पहिला भाग अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट केला आहे. यामध्ये काँग्रेस काळात 48,20,69,00,00,000 इतक्या प्रचंड रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या व्हिडिओमध्ये (Congress Files) देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओवरून काँग्रेस समर्थक आणि त्याच्याशी संलग्न संघटनांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. परंतु, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिकृत हँडलद्वारे व्हिडिओ ट्विट करत भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस फाइल्सच्या पहिल्या भागामध्ये काँग्रेसच्या राजवटीत एकामागून एक भ्रष्टाचार आणि घोटाळे कसे झाले, हे दाखविण्यात आले आहे. 'काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार' असे शीर्षक असलेल्या 184 सेकंदांच्या भागामध्ये भाजपने आरोप केला आहे की, काँग्रेसने आपल्या 70 वर्षांच्या राजवटीत जनतेकडून 48,20,69,00,00,000 रुपये लुटले आहेत. तो पैसा सुरक्षा आणि विकासाच्या अनेक उपयुक्त क्षेत्रांसाठी वापरता आला असता. 24 आयएनएस विक्रांत, 300 राफेल जेट आणि 1,000 मंगल मिशन या रक्कमेतून खरेदी करता आले असते. परिणामी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीमुळे देश प्रगतीच्या शर्यतीत मागे पडला.

2004 ते 2014 या काँग्रेसच्या कार्यकाळाला "गमावलेले दशक" असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील भाषणादरम्यान हा एक वाक्प्रचार वापरला होता. तसेच सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केल्याने तत्कालीन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती.

त्या काळी भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी पेपर भरले जायचे, ते बघून प्रत्येक भारतीयांचे डोके शरमेने खाली झुकायचे. 1.86 लाख कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा, 1.76 लाख कोटी रुपयांचा 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा, 10 लाख कोटी रुपयांचा मनरेगा घोटाळा, 70 हजार कोटी रुपयांचा कॉमनवेल्थ घोटाळा, इटलीसोबतच्या हेलिकॉप्टर व्यवहारात 362 कोटी रुपयांची लाच, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना 12 कोटींची लाच आदी प्रकरणांचा समावेश आहे.

हा फक्त काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा ट्रेलर आहे. चित्रपट अजून बाकी आहे, असे भाजपने व्हिडिओच्या शेवटी पुढील भागाच्या आशयाची झलक दाखवताना म्हटले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news