LPG cylinder prices today | मोठा दिलासा! गॅस सिलिंडर दरात ८३ रुपयांची कपात, जाणून घ्या नवा दर

LPG cylinder prices today | मोठा दिलासा! गॅस सिलिंडर दरात ८३ रुपयांची कपात, जाणून घ्या नवा दर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात (Commercial gas cylinder prices) पुन्हा एकदा कपात केली आहे. पण घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरात कोणताही बदल केलेला नाही. नवीन दरानुसार, दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. या सिलिंडरची किंमत आता १,७७३ रुपये झाली आहे. याआधी हा दर १,८५६ रुपये होता. १ मे २०२३ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात १७२ रुपयांची कपात केली होती. आता पुन्हा दरात कपात केली आहे. (LPG cylinder prices today)

१ मे २०२३ रोजी घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत १,१०३ रुपये होती. या दरात कोणताही बदल केलेला नाही. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १,७७३ रुपये झाली आहे. आज १ जून रोजी या सिलिंडरची किंमत दिल्लीत १८५६.५० रुपयांवरुन १,७७३ रुपये, कोलकातामध्ये १,९६० रुपयांवरुन १,८७५ रुपये, मुंबईत १,८०८.५० रुपयांवरुन १,७२५ रुपये आणि चेन्नईत २,०२१.५० रुपयांवरून १,९३७ रुपये झाली आहे.

व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी अशा दोन्ही सिलिंडरच्या दरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल केला जातो. नवीन दर १ जूनपासून लागू होतील. (LPG cylinder prices today)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news