पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तान समर्थक आणि 'वारस पंजाब डे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा अद्याप फरार आहे. पंजाब पोलिस १८ मार्चपासून त्याचा शोध घेत आहेत. आज पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पंजाब सरकारने अमृतपालबाबत महत्त्वाची माहिती दिली .
या प्रकरणी वकील इमान सिंह खारा यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. अमृतपाल सिंग बेकायदेशीर पोलिस कोठडीत असून त्याची सुटका करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आज न्यायमूर्ती एन. एस. शेखावत यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. या वेळी पंजाब सरकारने उच्च न्यायालयात माहिती दिली की, पोलिस अमृतपाल सिंग याला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल. अमृतपाल सिंग याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
ॲडव्होकेट जनरल यांना न्यायालयाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. तसेच याचिकाकर्त्याला कथित अटकेचे पुरावे सादर करण्यास सांगणारे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे.
हेही वाचा :