भारतीय पथकाचे तुर्कीत नागरिकांकडून कौतुक

भारतीय पथकाचे तुर्कीत नागरिकांकडून कौतुक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भूकंपग्रस्त तुर्कीत मदत आणि बचाव कार्यासाठी गेलेल्या भारतीय पथकाने पोहोचल्या क्षणापासून कामाला प्रारंभ केला असून गुरुवारी एका बालकाला ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात यश मिळाले. एनडीआरएफच्या पथकांशिवाय भारतीय लष्कराचे एक पथकही मदतकार्यात सहभागी झाले असून त्यांच्या कामावर स्थनिक नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

भारताने तुर्कीत 'ऑपरेश दोस्त' नावाने मदत व बचाव कार्यात झोकून दिले आहे. एनडीआरएफची दोन पथके आणि भारतीय लष्कराचे एक पथक या कामी ठिकठिकाणी तैनात आहेत.

भारताने पाठवलेली मदत वितरित करण्यात येत आहे. तर एनडीआरएफची पथके स्थानिक प्रशासनासोबत ताळमेळ ठेवून बचाव कार्य करीत आहे. स्थानिक नागरिकांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार्‍या लष्कराच्या एका पथकातील महिला कर्मचार्‍याला एका ज्येष्ठ तुर्की महिलेने जवळ घेत तिचे प्रेमभराने चुंबन घेतानाचा फोटो भारतीय लष्कराने शेअर केला आहे. या फोटोतील मायेेने अनेकांना हेलावून टाकले आहे. हजारो जणांनी या फोटोचे व भारतीय पथकाच्या कामाचे कौतुक केले आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news