मायक्रोसॉफ्टपाठोपाठ Yahoo कडूनही दिला जाणार १६०० कर्मचाऱ्यांना नारळ | पुढारी

मायक्रोसॉफ्टपाठोपाठ Yahoo कडूनही दिला जाणार १६०० कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा, ट्वीटर आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे सत्र सुरू असतानाच आता ‘याहू’नेही कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. याहूने आपल्या १६०० कर्मचाऱ्यांची कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या जाहिरातींच्या निम्म्या हिस्स्यावर परिणाम होणार आहे. हा बदल Yahoo च्या एकूण नफ्यासाठी कमालीचा फायदेशीर ठरेल, असे याहूचे सीईओ जिम लैनजोन यांनी म्हटले आहे. Yahoo)

१६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार नारळ Yahoo)

कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या निर्णयामुळे कंपनीला फायदेशीर व्यवसायांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास मदत होईल. याहूने शुक्रवारी (दि.१०) १२ टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जातील. तसेच पुढील सहा महिन्यांत आणखी ८ टक्के कंपनी कामावरून कमी करेल, अशी माहिती याहूकडून देण्यात आली आहे. Yahoo)

‘ही’ कंपनी केली जाणार बंद

‘इंटिग्रेटेड स्टॅक’ ऑफर करून जाहिरात तंत्रज्ञान उद्योगात स्पर्धा करणे, ही आमच्या जाहिरात व्यवसायाची अनेक वर्षांपासूनची रणनीती होती. अनेक वर्षांचे प्रयत्न आणि गुंतवणूक असूनही, ही रणनीती फायदेशीर नव्हती, असे याहू या कंपनीचे प्रवक्ते म्हणाले. Yahoo ही कंपनी टेक कंपन्यांच्या वाढत्या यादीत सामील झाली आहे. ज्या कंपन्यांनी जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थितीत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. (Yahoo)

हेही वाचलंत का?

Back to top button