ऑस्ट्रेलिया हटवणार चिनी निगराणी कॅमेरे; हेरगिरीला चाप लावण्यासाठी घेतला निर्णय | पुढारी

ऑस्ट्रेलिया हटवणार चिनी निगराणी कॅमेरे; हेरगिरीला चाप लावण्यासाठी घेतला निर्णय

कॅनबेरा; वृत्तसंस्था : चीनच्या हेरगिरीला चाप लावण्यासाठी ऑस्ट्रेलियाने चिनी कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी सांगितले की, संरक्षण विभाग आपल्या निगराणी तंत्रज्ञानाचा आढावा घेत आहे.

चिनी कंपन्या हिकव्हिजन आणि दहुआद्वारे विकसित आणि निर्मित 913 कॅमेरे, इंटरकॉम, इलेक्ट्रॉनिक प्रवेश प्रणाली आणि व्हिडिओ रेकॉर्डर संरक्षण खाते आणि व्यापार व विदेश खात्यांच्या आणि संस्थांच्या कार्यालयात लावले आहेत. याआधी अमेरिका आणि ब्रिटननेही नोव्हेंबरमध्ये आपल्या सरकारी कार्यालयांतून चिनी कंपन्यांच्या निगराणीची उपकरणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर उपकरणे यांत निम्म्याहून अधिक वस्तू चीनच्याच आहेत. चीनमध्ये तयार करण्यात आलेले निगराण कॅमेरे हे इंटरनेट आधारित अ‍ॅपच्या माध्यमातून काम करतात. हे अ‍ॅप स्मार्ट फोनवर इन्स्टॉल करताना सर्व परवनाग्या मागितल्या जातात. त्यांना होकार दिल्यास लांब अंतरावरून घर, कार्यालय किंवा संस्थेची या कॅमेराद्वारे निगराणी करत असेल तर त्याचा डेटा चीनपर्यंत पोहोचतो. जगात 33 हजार शहरांत 24 तास 48 लाखांहून अधिक चिनी कॅमेरे हे इंटरनेट आधारितच कार्य करतात. निगराणी उपकरणे व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची जागतिक बाजारपेठ 4 लाख कोटी रुपयांची आहे. तर त्यात चीनचा वाटा दोन तृतीयांश आहे. ब्रिटनमध्ये 13 लाख चिनी कॅमेरे ब्रिटनची संसद, सरकारी कार्यालये, रस्ते, पोलिस ठाणी, कॉलेज, रुग्णालयांत बहुतांश हिकव्हिजन कंपनीचे 13 लाख कॅमेरे होते. ब्रिटनच्या 60टक्के सरकारी कार्यालयात, 73टक्के स्थानिक प्रशासन कार्यालयांत, 35 टक्के पोलिस ठाण्यांत आणि 63टक्के शाळांमध्ये चिनी बनावटीचे कॅमेरे लावले होते.

अधिक वाचा :

Back to top button