Chris Gayle on MS Dhoni | धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला? ख्रिस गेलने केला खुलासा

Chris Gayle on MS Dhoni | धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला? ख्रिस गेलने केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2007 सालचा T20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने IPL च्या 17 व्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेची कमान सोपवण्यात आली. धोनीच्या अचानक कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता याप्रकरणी युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचे वक्तव्यही समोर आले आहे. (Chris Gayle on MS Dhoni)

गेलने सांगितले की, धोनी कदाचित आयपीएलच्या या हंगामात मध्यंतरी ब्रेक घेवू शकतो, यामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल मुलाखतीदरम्यान म्हणाला, धोनी कदाचित काही सामन्या दरम्यान विश्रांती घेवू शकतो. त्यामुळे धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा. पण एक गोष्ट निश्चित आहे की धोनी या मोसमात चांगली कामगिरी करेल आणि त्याबद्दल कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल (दि.22) झालेल्या सामन्या दरम्यान गेलने हे वक्तव्य केले. गेलच्या आधीही अनेक खेळाडूंनी धोनीचे कर्णधारपद सोडण्याबाबत मत व्यक्त केले आहे. (Chris Gayle on MS Dhoni)

मैदानावर धोनीची 'चिते की चाल'

धोनी आयपीएलच्या हंगामानंतर स्पर्धेतून निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. धोनी 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे . कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी लवकरच आयपीएलला अलविदा करणार असल्याच्या चर्चेला अधिक वेग आला आहे. मात्र, बंगळूरविरुद्धच्या 17व्या मोसमातील पहिल्या सामन्यात धोनी मैदानावर नेहमीसारखाच दिसत होता. धोनीने विकेटच्या मागे तोच वेग दाखवत होता. बंगळुरूच्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धोनीने अनुज रावतला रन आऊट केले.

धोनीने केली सपोर्ट स्टाफला मदत

धोनीने मैदानावर आपल्या कामगिरीने अनेकवेळा लोकांची मने जिंकली आहेत. असेच काहीसे त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव सत्र सुरू असताना धोनी सीएसकेच्या सपोर्ट स्टाफला मदत करताना दिसला. सपोर्ट स्टाफ मैदानाबाहेर खेळाडूंचे ड्रिंक्स घेत होता आणि यादरम्यान धोनीने त्यांना मदत केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी मदत केल्याबद्दल धोनीचे कौतुक केले. (Chris Gayle on MS Dhoni)

कर्णधार म्हणून ऋतुराजचा विजयी श्रीगणेशा

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची कमान घेण्याची जबाबदारी ऋतुराज गायकवाड यांच्यावर आली. कर्णधार म्हणून ऋतुराजने पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावली होती. या सामन्यात फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यावेळी या सामन्यात आरसीबी मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते. मात्र, बंगळूरचा वेगवान गोलंदा मुस्तफिझूर रहमानने डुप्लेसिसला बाद करून सीएसकेला पहिले यश मिळवून दिले आणि यानंतर आरसीबीची लय बिघडली. यानंतर बंगळूरने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चेन्नईने ऋतुराजच्या नेतृत्वाखाली विजयी सुरुवात केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news