Chinese on LAC : चीनच्‍या कुरापती सुरुच, पूर्व लडाखमध्‍ये लढाऊ विमाने घुसखोरीच्‍या प्रयत्‍नात!

Chinese on LAC : चीनच्‍या कुरापती सुरुच, पूर्व लडाखमध्‍ये लढाऊ विमाने घुसखोरीच्‍या प्रयत्‍नात!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सीमेवरील भागात कपटी चीनने आपल्‍या कुरापती सुरुच ठेवल्‍या आहेत. वृत्तसंस्‍था 'एएनआय'च्‍या रिपोर्टनुसार भारताबरोबर कमांडर स्‍तरावर चर्चा सुरु असतानाला पूर्व लडाख भागात चीनच्‍या लढाऊ विमाने घुसखोरीच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचे दिसत आहे. ( Chinese on LAC ) चीनचे लढाऊ विमाने ही प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषा ( एलएसी) परिसरात उड्‍डाण घेत आहेत. भारतीय संरक्षण व्‍यवस्‍था किती चोख आहे याचा अंदाज घेण्‍यासाठी या कुरापती सुरु असल्‍याचे मानले जात आहे.

Chinese on LAC : भारतीय हवाई दल सतर्क

'एएनआय'ने आपल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, मागील तीन ते चार आठवडे चीनची लढाऊ विमाने 'एलएसी' परिसरात उड्‍डाण घेत आहेत. मात्र भारतीय हवाई दल सतर्क आहे. आणि अत्‍यंत जबाबदारी सर्व परिस्‍थिती हाताळत आहे. भारतीय हवाई दल चीनकडून असणारा धोक्‍याचा मुकाबला करण्‍यासाठी सज्‍ज आहे. त्‍याचबरोबर चीनच्‍या आक्रमकतेमध्‍ये वाढ होणार नाही, याचीही दक्षता हवाई दल घेत आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चीनचे के जे-११ या लढाऊ विमानासह अन्‍य विमानही प्रत्‍यनियंत्रण रेषेजवळ उड्‍डाण घेत आहेत. मागील काही दिवसांमध्‍ये 'एलएसी'च्‍या १० किलोमीटर परिसरात उभय देशांमधील विश्‍वास निर्माण उपाय लाइनचे उल्‍लंघन होत असल्‍याचे प्रकार समोर आले आहेत.

चीनला सडेतोड उत्तर देण्‍यासाठी उपाययोजना सुरु

चीनच्‍या कुरापती सुरु असतानाचा भारतीय हवाई दलानेही चीनला सडेतोड उत्तर देण्‍यासाठी उपाययोजना सुरु केल्‍या आहेत. भारतीय हवाई दलातील मिग-२९ आणि मिराज २०००सह सर्वाधिक शक्‍तीशाली लढाऊ विमान या ठिकाणी
पाठविण्‍यात आली आहेत. चीनचे कोणतीही आगळीक केली तर भारीत हवाई दलाची लढाऊ विमाने त्‍याला सडेतोड उत्तर देवू शकतात, असेही 'एएनआय'ने आपल्‍या वृत्तात स्‍पष्‍ट केले आहे.

पूर्व लडाख परिसरातील भारताकडून सुरु असलेल्‍या पायाभूत सुविधांच्‍या कामांवर चीनच्‍या पीपुल्‍स लिबरेश आर्मी तणावात आहे. त्‍यामुळेच पुन्‍हा कुरापती सुरु झाल्‍या आहेत. मात्र भारतीय हवाई दल आपल्‍या नियंत्रणातील क्षेत्रातील चीनच्‍या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. एप्रिल-मे २०२०मध्‍ये 'एलएसी'वर चीनकडून एकतर्फी परिस्‍थिती बदलण्‍याची धडपड सुरु झाली. तेव्‍हापासून भारतानेही लडाखमध्‍ये पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्‍यावर भर देत आहे.

नुकत्‍याच एका मुलाखतीमध्‍ये हवाई दलाचे प्रमुख विवेक राम चौधरी महणाले होते की, चीनचे लढाऊ विमान हे प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेच्‍या जवळ आल्‍याचे आमच्‍या निदर्शनास आल्‍यास आम्‍ही योग्‍य कारवाई करु. आम्‍ही आमची यंत्रणा हाय अलर्टवर ठेवले आहे. त्‍यामुळे त्‍यांना बर्‍याच प्रमाणात चाप बसला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news