उरुमकी आग दुर्घटनेनंतर चीनमध्ये संतापाची लाट; शी जिनपिंग यांच्या हकालपट्टीची मागणी (व्‍हिडीओ)

उरुमकी आग दुर्घटनेनंतर चीनमध्ये संतापाची लाट; शी जिनपिंग यांच्या हकालपट्टीची मागणी (व्‍हिडीओ)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील झिनजियांगची राजधानी उरुमकीमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू होरपळून मृत्‍यू झाला. या दुर्घटनेनंतर राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍याविरोधात चीनमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे. आज (रविवार) सकाळी शांघायमध्ये निदर्शने केली. चीनच्या अनेक शहरांतून आलेले लोक "शी जिनपिंग हटवा, चिनी कम्युनिस्ट पार्टी हटवा, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे," अशा घोषणा देत आहे.

झिनजियांग प्रदेशाची राजधानी उरुमकी येथे गुरुवारी एका इमारतीला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण चीनमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोरोना नियमानुसार इमारत बंद होती. त्‍यामुळे आग लागली तरी नागरिकांना सुरक्षित स्‍थळी जात आले नाही. या घटनेला कोरोनामुळे लादलेल्‍या लॉकडाउनला जबाबदार धरण्‍यात आले आहे.

आम्हाला आरोग्य नियम  नको स्वातंत्र्य हवे आहे…

शांघाय हे चीनचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आणि आर्थिक केंद्र आहे. तेथील रहिवासी शनिवारी रात्री वुलुमकी रोडवर जमले होते. त्यानंतर त्याचे रुपांतर आंदोलनात झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, शांघायमधील एक जमाव "उरुमकीमधून लॉकडाऊन हटवा, झिनजियांगमधून लॉकडाऊन हटवा, संपूर्ण चीनमधून लॉकडाऊन हटवा" अशा घोषणा देत आहेत. शांघायमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक पोलिसांचा सामना करत असल्याचे आणि "लोकांची सेवा करा, आम्हाला आरोग्य नियम  नको आहेत, आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे" असे म्हणत आहेत. चीनच्या सोशल मीडियावरही लोकांचा या विरोधाला पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news