UP Election Result : उत्तरप्रदेशमध्ये जनतेच्या आशीर्वादामुळे भाजप पुन्हा सत्तेत!

UP Election Result : उत्तरप्रदेशमध्ये जनतेच्या आशीर्वादामुळे भाजप पुन्हा सत्तेत!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेश ( UP Election Result ) मधील जागांचे निकाल जवळजवळ हाती आलेले आहेत. उत्तरप्रदेश मध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी पक्ष भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे जाहीररित्या आभार मानले. केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्याचे म्हणत त्यांनी यावेळी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( UP Election Result ) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला आणि सुशासनास जनतेने पुन्हा एकदा पसंती दिली आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यात यशस्वी झाली आहे. यावेळी आदिनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. तसेच उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार व्यक्त करत त्यांचे देखिल अभिनंदन केले.

योगी आदित्यनाथ ( UP Election Result ) पुढे म्हणाले, मागील दोन दिवसांपासून खोटा प्रचार केला जात होता पण, जनतेने त्याला योग्य उत्तर दिले आहे. जनतेने घराणेशाही, जातीवादाला नकार देत विकास आणि परिवर्तनाला मत दिले आहे. कोरोनाच्या काळात भाजप सरकार विरुद्ध कटकारस्थाने रचण्यात आली. सरकारवर टिका करण्यात आली. पण, भाजप सरकार नेहमी जनतेसोबत राहिले. जनतेने विकासालाच प्राधान्य दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी लोककल्याणकारी योजना राबवल्या. कोराना काळात गरिब जनतेसाठी अन्न धान्य पोहचविले. यासर्वांचे फळ म्हणून हे यश जनतेने भाजपच्या पदरात टाकले असल्याचे मुख्यमंत्री योगी आदीनाथ म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी निवडणूक आयोगाचे आभार मानले. तसेच कोरानाच्या काळात आणि एकूण सात टप्प्यात उत्तर प्रदेश मधील निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल देखिल आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. तसेच या पुढे उत्तरप्रदेश मध्ये विकासाची गंगा अशीच अविरत वाहत राहिल, असे सांगत उत्तरप्रदेशला देशातील सर्वात यशस्वी राज्य बनविण्याचा संकल्प देखिल व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news