Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक

Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक

पुढारी ऑनलाईन: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवान यांच्यात आज (दि.) पुन्हा चकमक झाली. नक्षलवादी आणि जिल्हा राखीव गटाचे (DRG) जवान यांच्यात झालेल्या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी जखमी झाले आहेत, अशी माहिती छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्याचे एसपी सुनील शर्मा यांनी दिली आहे.

एसपी सुनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा कहर केला आहे. येथे झालेल्या चकमकीत सुमारे चार ते पाच नक्षलवादी जखमी झाले असून, सुरक्षा जवान सुरक्षित आहेत. या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा जवानांची शोधमोहीम सुरू आहे, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news