

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 21, Bihar census : बिहारमधील जातनिहाय जनगणनेला विरोध करीत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या 28 एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी स्पष्ट केले. यासंदर्भात एका वकिलाने नव्याने याचिका दाखल केली आहे.
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला 15 एप्रिलपासून सुरुवात झाली असून 15 मे रोजी ही जनगणना संपणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्या वकिलाकडून न्यायालयाला देण्यात आली. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या जनगणनेला विरोध करीत दाखल झालेली याचिका यापूर्वी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. याचिकाकर्त्यांनी सदर प्रकरणात संबंधित उच्च न्यायालयात दाद मागावी, अशी टिप्पणीही त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.
हे ही वाचा :