Chandrayaan-3 : चंद्रावर सुर्योदय झाल्यानंतर विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार का? इस्रोलाही प्रतिक्षा..

Chandrayaan-3
Chandrayaan-3

पुढारी ऑनलाईन डेस्क (Chandrayaan-3)  : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) चंद्रयान-३ मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली. या मोहिमेनुसार, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर भारताने चंद्रावर यशस्वीरित्या उतरविले. इस्रोने ३ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला स्लीपमोडमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, चंद्रवर सुर्य उगवल्यानंतर प्रज्ञान आणि रोव्हर आपले काम पुन्हा सुरु करतात का? हे पाहण्यासाठी इस्रोकडून प्रतिक्षा करण्यात येत आहे. (Chandrayaan-3)

"आम्हाला कळण्याचा मार्ग असता तर ते सोपे झाले असते. मात्र, सध्यातरी सुर्य उगवल्यानंतर विक्रम आणि रोव्हर काम करु शकतील का? याचीच वाट पहावी लागणार आहे, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले आहेत.  जर यंत्रणा रात्री टिकून राहिली आणि पुन्हा ती कार्यरत झाली, तर पुढील प्रक्रिया आपोआप होईल. बुधवारी चंद्रावर सुर्योदय झाला. परंतु, विक्रम आणि प्रज्ञान यांना पुन्हा सक्रिय होण्यासाठी सूर्याच्या उजव्या बाजूंनी येणाऱ्या किरणांची गरज असेल. (Chandrayaan-3)

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news