Rupert Murdoch Steps Down : रुपर्ट मर्डोक यांचा FOX च्या अध्यक्षपदावरुन राजीनामा; ७ दशकानंतर झाले पदमुक्त

Rupert Murdoch Steps Down
Rupert Murdoch Steps Down
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मीडिया क्षेत्रातील दिग्गज रुपर्ट मर्डोक यांनी फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. आज (दि.२१) सकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. ९२ वर्षीय रुपर्ट मर्डोक हे अनेक वर्षांपासून मीडिया क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जातात. त्यांनी तब्बल ७ दशके फॉक्सचे अध्यक्षपद भुषवले आहे. दरम्यान, आता त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या मुलावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Rupert Murdoch Steps Down)

रूपर्ट मर्डोकने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये काय लिहिले?

उद्योगपती रुपर्ट मर्डोक यांनी मेमोमध्ये लिहिले आहे की, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी फॉक्स कॉर्पोरेशन आणि न्यूज कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष एमेरिटसच्या भूमिकेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझे आयुष्य बातम्या आणि स्टोरीजमध्ये व्यस्त राहिले आहे. राजीनामा दिल्यामुळे यामध्ये मोठे बदल होणार नाहीत. परंतु,आता माझ्यासाठी वेगळी भूमिका स्वीकारण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे दोन्ही कंपन्यांमध्ये अत्यंत प्रतिभावान आणि संपूर्ण समर्पण देणारे लोक आहेत. लॅश्लेन आतापासून दोन्ही विलची जबाबदारी स्वीकारतील. कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम करा." (Rupert Murdoch Steps Down)

द डेली बीस्टने दिलेल्या वृत्तानंतर ही माहिती समोर आली आहे. द डेली बीस्टने राजीनाम्याची कागदपत्रे मिळवली. रुपर्ट मर्डोक यांनी लिहिले आहे की, दशकांमध्ये आम्ही संयुक्तपणे जे काही साध्य केले आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी माझे सहकारी आणि संस्थेचा आभारी आहे. (Rupert Murdoch Steps Down)

पाचव्या लग्नामुळे रूपर्ट मर्डोक चर्चेत होते (Rupert Murdoch Steps Down)

रुपर्ट मर्डोक यांनी २० मार्च रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. रूपर्ट यांनी ६६ वर्षीय माजी पोलिस महिला अॅन लेस्ले स्मिथ यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. अॅन लेस्ले यांना ते कॅलिफोर्नियामध्ये एका खासगी कार्यक्रमादरम्यान भेटला होता. (Rupert Murdoch Steps Down)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news