चंद्रपूर : बळीराजाला विजबिलाचा झटका, कुडाच्या घरात आले तब्बल १ लाखाचे वीजबिल

चंद्रपूर : बळीराजाला विजबिलाचा झटका, कुडाच्या घरात आले तब्बल १ लाखाचे वीजबिल

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके या शेतकऱ्याला एक लाख 380 रूपयाचे वीज बिल आले आहे. कुडाच्या घरात एकही विद्युत उपकरण नाही, तरीही महावितरणने पाठवलेले वीजबिल पाहून शेतकऱ्याला धक्का बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. येथे केशवराव भिमू कोटनाके यांचे कुडाचे छोटेसे घर आहे. घरात कोणतंही विद्युत उपकरण नाही. केवळ वीजेचे दोन बल्ब आहेत. तरीही महावितरणकडून या शेतकऱ्याला एका महिन्याचे वीज बिल तब्बल 1 लाख 380 रूपये पाठविण्यात आले आहे. वीजबिल पाहताच कोटनाके यांना मोठा धक्का बसला. त्वरीत त्यांनी महावितरण कार्यालय गाठले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर रक्कम कमी केली. पण तरीही भरावयाची रक्कम हजारोंच्या घरात ठेवली. ४४ हजार २९० रुपये वीजबिल अधिकाऱ्यांनी भरायला सांगितले आहे. एवढी रक्कम भरायची कोठून हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. एकंदरीत पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news