पिंपरी : वाल्हेकरवाडीत पदपथ, रस्त्याचे काम रखडले; पादचार्‍यांची वाट बिकट | पुढारी

पिंपरी : वाल्हेकरवाडीत पदपथ, रस्त्याचे काम रखडले; पादचार्‍यांची वाट बिकट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन परिसरातील रस्त्याचे आणि पदपथाचे काम रखडल्याने येथील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाल्हेकरवाडी परिसर हा अतिशय दाट लोकवस्तीचा असून, या परिसरात शाळा, रूग्णालये आणि मंगल कार्यालये असल्याने सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. बर्‍याच दिवसांपासून येथील पदपथ आणि रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत होती.

येथील नागरिकांना ये-जा करताना अडथळा होत होता. मात्र हे काम रखडल्याने या ठिकाणी पाणी साचून चिखल बनला आहे. येथून वाहतूक करताना नागरिकांच्या अंगावर चिखल आणि घाण साचलेले पाणी उडत आहे. तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे कपडेही चिखलाने माखत आहेत. त्यामुळे रखडलेले काम त्वरित सुरू करून, पदपथ व रस्ता पूर्ण करावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button