चंद्रपूर : ‘त्या’ तरूणीच्या हत्येप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक

चंद्रपूर : ‘त्या’ तरूणीच्या हत्येप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : आठवडाभरापूर्वी भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात एका २२ वर्षी तरूणीचा निर्वस्त्र मृतदेह आढळून आला होता. या हत्याकांडात तिच्याच एका अल्पवयीन मैत्रिणीला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री बल्लारपूर रेल्वे स्थानकावर केरळात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी एका २६ वर्षीय संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकर शेखर कुरवान (रा. भद्रावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सोमवारी ( दि. ४) सकाळी एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात बेवारस फेकून देण्यात आला होता. चार दिवस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली होती. घटनेच्या पाचव्या दिवशी त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. ही तरूणी रामटेक येथील आहे. त्यानंतर एका अल्पवयीन मुलीला चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले होते. तिने गुन्हा मान्य करून हत्याकांडाची आपबिती सांगितली.

मृत तरूणी ही अल्पवयीन संशयित आरोपी मुलीची मैत्रीण होती. एकाच खोलीत त्या भाड्याने राहत होत्या. दोघींमध्ये एक दिवस वैयक्तिक कारणांवरून भांडण झाले होते. त्यानंतर मृत तरूणी ही आरोपी मुलीचा वारंवार अपमान करीत होती. त्यामुळे तिच्याकडून होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या तरूणीच्या हत्येचा कट रचला. आणि एका मित्राच्या मदतीने त्या तरूणीला निर्जनस्थळी नेऊन तिची अमानुषपणे हत्या केली. त्यानंतर मुंडके धडावेगळे करून चंद्रपुरातील दाताळा मार्गावरील रामसेतू पुलाच्या खाली फेकून दिले. १० एप्रिलला गोताखोरांच्या मदतीने रामसेतू पुलाखालील नदीतून मुंडके शोधून काढण्यात आले होते.

मात्र, या संपूर्ण हत्याकांडात महत्वाची भूमिका बजावणारा आरोपी शंकर शेखर कुरवान (रा. भद्रावती) हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. पोलिसांना चकमा देत तो सोमवारी बल्लारपूर रेल्वेस्थानकावरून केरळला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपी रेल्वेस्थानकावर मोटारसायकल पार्क करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक बोबडे यांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. आता या हत्याकांडातील अनेक बाबी उघड होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news