मुंबई; पुढारी ऑनलाईन : INS vikrant case : आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. सोमय्यांच्या मुंलुंड येथील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दारात एक नोटीस लावली आहे. दरम्यान आयएनएस विक्रांत प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन नाकारल्यानंतर सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल आहेत. किरीट सोमय्या उद्यापर्यंत हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखा सोमय्या पिता-पुत्रांना नोटीस बजावली. उद्या दोघे चौकशीसाठी हजर न राहिल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सोमय्या पिता-पुत्रांविरोधात वॉरंट जारी करण्यात येणार आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तीन पथके तयार केली आहेत. सोमय्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना होतील. त्यामुळे उद्या हजर न झाल्यास सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर 'नॉट रिचेबल' झाले आहेत. तर झेड सुरक्षा असलेले किरीट सोमय्या कुठे आहेत, यासंदर्भात केंद्राला विचारणा करणार आहे", अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर विरोधा पक्षांकडून जोरदार आरोप होत आहे. त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारही भाजपाविरुद्ध आक्रमक झालेली दिसून येत आहे.
शिवसेनेचा खासदार यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार टीका करताना दिसत आहेत. तर किरीट सोमय्या आता आपल्याला जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांची माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही.