पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे -पाटील मागील १० दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपोषणस्थळी पाटील यांची भेट घेऊन सरकारचा निरोप दिला. आज (दि.८) रात्री १०. ३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार असून पाटील यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला जालन्यातील मराठा शिष्ठमंडळ उपस्थित राहणार आहे. आता या बैठकीला सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा