जालना: कुंभारपिंपळगाव येथे ६० तरुणांनी मुंडन करून केला शासनाचा निषेध
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आणि मनोज जरांगे- पाटील यांच्यावतीने आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुंभारपिंपळगाव येथे साखली उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आज निषेध मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी ५० ते ६० नागरिकांनी मुंडन केले.
निषेध मुंडन आंदोलनास नाभिक समाजातील आणि माहेश्वरी समाजातील प्रत्येकी एक व्यक्तीने स्वतःचे मुंडन करून पाठिंबा दर्शवला. सर्व समाज बांधव आंदोलनास्थळी भेट देऊन समर्थन करत आहेत.
कुंभारपिंपळगाव परिसरातील अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये उपोषणे सुरू असून यामध्ये खडका, बोडका, भादली, राजेगाव, राजेटाकळी यासह अनेक गावांचा समावेश आहे. यातील खडका येथे सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणातील उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली आहे. त्यांना घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा

