पुढारी ऑनलाईन: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी (दि.१४) सीबीआयकडून समन्स जारी करण्यात आले होते. याप्रकरणी आज (दि.१६) केजरीवाल यांची सकाळी ११ वाजता सीबीआय चौकशी होणार आहे. या चौकशीला अरविंद केजरीवाल हजर राहणार असल्याचे त्यांनी शनिवारी (दि.१४) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
यानंतर शनिवारी (दि.१४) अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत, सीबीआयने मला रविवारी बोलावले आहे. मी जाणार, जर केजरीवाल भष्ट्राचारी आहे, तर या जगात प्रामाणिक कोणी नाही, असे स्पष्ट केले होते. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दखील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर मद्य घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे.