BSP MLA Raju Pal murder case | बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी अतिक अहमद गँगमधील सर्व ७ जण दोषी

BSP MLA Raju Pal murder case | बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी अतिक अहमद गँगमधील सर्व ७ जण दोषी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी लखनौच्या सीबीआय न्यायालयाने सर्व ७ आरोपींना दोषी ठरवले. गुन्हेगार ते राजकारणी बनलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने सहाजणांना जन्मठेप आणि एकाला चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (BSP MLA Raju Pal murder case)

पोलिस एस्कॉर्ट दरम्यान गोळ्या लागून मृत्यू झालेला अतिक अहमद आणि अशरफ हे राजू पाल हत्या प्रकरणात आरोपी होते. आता उर्वरित सर्व ७ आरोपी आबिद, फरहान, जावेद, अब्दुल कवी, गुल हसन, इसरार आणि रणजीत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. १९ वर्षांपूर्वी २५ जानेवारी २००५ रोजी प्रयागराजच्या धुमनगंजमध्ये देवीलाल पाल आणि संदीप यादव यांच्यासह तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

सीबीआयने या प्रकरणी माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा लहान भाऊ, माजी आमदार अश्रफ उर्फ ​​खालिद अझीम यांच्यासह १० जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पण, गेल्या वर्षी प्रयागराज येथील रुग्णालयातून पोलिस त्यांना एस्कॉर्ट करत असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना तीन तरुणांनी गोळ्या घालून ठार केले होते. गुलफूल उर्फ ​​रफिक अहमद याचाही खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.

राजू पाल यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली होता. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेते राजू पाल यांची २५ जानेवारी २००५ रोजी अतिक अहमद यांचा भाऊ अश्रफ यांच्याशी असलेल्या राजकीय वैमनस्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ज्यांचा त्याने २००४ मध्ये प्रयागराज पश्चिमेतील जागेवरील पोटनिवडणुकीत पराभव केला होता.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २०१६ मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. या हत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अतिक गॅंगमधील सर्व आरोपींना आयपीसीच्या ३०२ (हत्या), १२० बी (गुन्हेगारी कट), १४७ (दंगल) आणि १४८ (सशस्त्र शस्त्रांसह दंगल) या कलमाखाली दोषी ठरवले आहे. (BSP MLA Raju Pal murder case)

 हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news