पुढारी ऑनलाईन डेस्क : बांदा कारागृहात असलेल्या गॅगस्टर मुख्तार अन्सारीची प्रकृती बिघडल्याने त्याला कडेकोट बंदोबस्तात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. (Mukhtar Ansari Death)
मुख्तार अन्सारी यांचा मुलगा उमर अन्सारीने दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारीची सकाळी बेशुद्ध अवस्थेत होता. मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीने सांगितले की, मुख्तारच्या मृत्यूबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. मुख्तारचे वकील वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले असून अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आज (दि. 28) दुपारी 3.30 वाजता मुख्तार अन्सारी याचा मुलगा उमर अन्सारी याच्याशी बोलणे झाले. उमरच्या म्हणण्यानुसार, मुख्तारने त्याच्या प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती.
दोन दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेजमधून परत आल्यानंतर मुख्तारने खाणेपिणे कमी केले होते. गुरुवारी दुपारपासून त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाचे अधिकारी मुख्तारला घेऊन रुग्णवाहिकेतून वैद्यकीय महाविद्यालयात घेवून आले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डॉक्टरांसोबत एम आणि एसपीही मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. यानंतर मुख्तारबाबत राज्यभरात विविध चर्चा होऊ लागल्या. यानंतर परिस्थिती चिगळू नये म्हणून निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते
हेही वाचा :