Khalistanists : लंडनमधील खलिस्तान समर्थकांवर गुन्हे दाखल

Khalistanists : लंडनमधील खलिस्तान समर्थकांवर गुन्हे दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : खलिस्तानवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर हल्ल्यानंतर लंडनमधील खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयावरील भारतीय झेंडा काढून टाकत निदर्शने केली. यानंतर येथील खलिस्तानी समर्थनकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. त्यानुसार लंडनमधील खलिस्तानी समर्थक भारतीय नागरिकांवर भारतात गुन्हे  दाखल करण्यात आले आहे.

गेले काही दिवसांपासून अमृतपाल सिंगला ताब्यात घेण्यासाठी पंजाब पोलिस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अमृतपाल सिंगला फरारी घोषित करण्यात आले असून, त्याला पकडण्यासाठी पंजाबसह शेजारील राज्यात तसेच सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान १९ मार्च 2023 रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर खलिस्तान समर्थकांनी आंदोलन करत निदर्शने केली. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर आयपीसी, यूएपीए आणि पीडीपीपी कायद्याच्या कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news