जळगाव : १३ लाखाचा गांज्या जप्त ; दोघांना ठोकल्या बेड्या

file image
file image
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा : धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीत १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर  (दि. १८)  संध्याकाळच्या वेळी गस्त घालत असताना एक विना नंबर असलेली पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. त्यावेळी गाडीत उग्र वास आल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत विक्रीसाठी चालवलेला १३ लाख ३६ हजार चारशे रुपये किंमतीचा एकुण ६२.०६६ किलो वजनाचा गांजा मिळून आला. ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखांनी हा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणात तुषार अरूण काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल देविदास बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर (दि. १८)  संध्याकाळच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोहेकाँ श्रीराम पोपट बोरसे, पोना सचिन देविदास अडावदकर, पोना बापू काशिनाथ पाटील, पोना दिपक पितांबर पाटील, पोना नरेंद्र महादू पाटील, चालक पोहेकॉ रावसाहेब नामदेव पाटील त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीणचे पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक अनिल आगोणे आदींनी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news