कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लवकरच बाजारात येणार ? किंमत किती असेल याची माहिती समोर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना (Corona) प्रतिबंधक कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लस लवकरच बाजारात येण्याची शक्‍यता आहे. तसेच बाजारात विक्रीसाठी या लसींना मान्यताही मिळू शकते. या लसीची किंमत जवळपास 275 रू आणि 150 रू अधिक अतिरिक्‍त सेवा अशी असेल. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांचे कडून कमी किंमतीत लस देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे.

तसेच, खासगी हॉस्‍पिटलमध्ये आतापर्यंत  कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1200 रू तर कोव्हीशिल्डची किंमत 780 रू प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये 150 रू इतके सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे. देशात या दोन्ही लसीचा उपयोग हा आपत्कालीन वापरासाठी करण्यात येत आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण यांचेकडून कोविड 19 वर तज्ज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला प्रौढांसाठी काही निर्बंधासह नियमित विक्रीसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (National Pharmaceutical Pricing Authority, NPPA) यांचे कडून लसींची किंमत 275 रू आणि 150 रू अतिरिक्‍त सेवा खर्च असा असण्यसाची शक्‍यता आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी 25 ऑक्‍टोबर रोजी ड्रग्स कंट्रोलर भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलकडे कोविशिल्ड बाजारात आणण्यायाठी मंजुरीसाठी अर्ज केला.

तसेच, काही आठवडयापूर्वी भारत बायोटेक (Bharat Biotech) चे संचालक वी कृष्ण मोहन यांनी कोव्हॅक्सिन बाजारात आणण्यासाठी त्‍यांची प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटा, रासायनिक, उत्पादन आणि नियंत्रणासह, नियमित बाजारात कोव्हॅक्सिन लाँच करण्याचे आवाहन केले. गेल्या वर्षी 3 जानेवारी रोजी कोविड-19 विरोधी लस कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनला या देशात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर करण्यात आली होती.

हे ही वाचलं का 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news