नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूरवरुन अमरावतीकडे १६ प्रवासी घेऊन जाणाऱ्या नागपूर -अमरावती शिवशाही बस शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्णपणे जळाली. ही घटना नागपूर – अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिरजवळ आज (दि. ४) सकाळी नऊच्या सुमारास घडली. सुदैवाने सर्व प्रवासी वेळेत बसखाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी नऊच्या सुमारास गणेशपेठ आगाराची शिवशाही बस (0788) नागपुरातून अमरावतीला निघाली होती. ही बस नागपूर – अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ आली असता बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यात आले. या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, एसटी महामंडळाचे बसच्या देखभाल, दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.
हेही वाचा