‘बीआरओ’प्रकल्पांमुळे दुर्गम भागात सामाजिक,आर्थिक विकास करणार : राजनाथ सिंह 

Defence Minister Rajnath Sing
Defence Minister Rajnath Sing
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  'बीआरओ'ने पूर्ण केलेल्या प्रकल्पांमुळे सशस्त्र दलांची परिचालन तयारी करण्यात आली आहे. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या  लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासात वाढ झाली आहे. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा विकास मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी 'नवीन भारत' निर्माण करण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे निदर्शक आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी (दि.7) केले. ते 'बीआरओ'च्या 63 व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते.
सीमावर्ती भागातील लोक जितके अधिक सक्षम असतील, तितकेच ते त्या भागाच्या सुरक्षेबाबत जागरूक आणि चिंतित असतील. नागरिक ही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार आपल्या सीमाभागाच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आपला निर्धार आहे. आमच्या सुरक्षेसाठी, 24  तास काम करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत होण्यासोबतच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. यामध्ये 'बीआरओ' अतिशय मोलाची भूमिका बजावत असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्‍हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये रस्ते, पूल आणि बोगद्यांचे महत्त्व अधोरेखित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, बीआरओ ने पूर्ण केलेल्या प्रकल्पांमुळे सशस्त्र दलांची परिचालन तयारी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासात वाढ झाली आहे. तसेच परिस्थिती सुधारली आहे. सीमावर्ती प्रदेश विकासाची नवीन केंद्रे म्हणून उदयास आले आहेत.
ईशान्येकडील प्रदेश केवळ स्वतःचाच विकास करत नाहीत, तर देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वारही बनले आहेत. ईशान्य प्रदेश भारताला दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियाशी जोडत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही राष्ट्राच्या प्रगतीसाठी या प्रदेशांचा विकास महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला. असे ते म्‍हणाले.
हेही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news