कोल्हापूर : राधानगरीच्या सुपुत्राने अमेरिकेतून शाहूंच्या प्रतिमेला केलं अभिवादन | पुढारी

कोल्हापूर : राधानगरीच्या सुपुत्राने अमेरिकेतून शाहूंच्या प्रतिमेला केलं अभिवादन

गुडाळ (कोल्हापूर) : पुढारी वृतसेवा : राधानगरी तालुक्यात छत्रपती शाहू महाराजांनी धरण बांधले आहे. त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता आल्याने माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एक मुलगा उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करत आहे. हे केवळ छत्रपतींच्या दूरदृष्टीच्या कार्यामुळेच शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेत सीएटल येथे कार्यरत असलेल्या तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथील सुपुत्र सौरभ धनाजीराव चौगले यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी (दि. ६) रोजी छत्रपती शाहूंच्या शताब्दी कृतज्ञता दिनानिमित्त अमेरिकेत सौरभ व त्यांची पत्नी ऐश्वर्या यांनी भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता छत्रपती शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्याचा हा फोटो दै. ‘पुढारी’ साठी शेअर केल्यानंतर सौरभ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सौरभ आणि ऐश्वर्या हे पती – पत्नी ॲमेझॉन कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button