नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
येथील रेल्वे स्थानकावर पवन एक्सप्रेस मध्ये माथेफिरूने गाडीतील प्रवाशांवर ऍसिडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले. तर प्रवाशांमध्ये खळबळ झाल्याने तातडीेन घटनास्थळी माथेफिरूस पकडण्यासीठी गेलेल्या आरपीएफवरही त्याने ॲसिड फेकले. या ॲसिड हल्ल्यात आरपीएफ आणि प्रवासी जखमी झाले असून माथेफिरुला आरपीएफने ताब्यात घेतले आहे.