पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra collection) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. एकीकडे चित्रपटाची टीम पहिल्या वीकेंडला १०० कोटींचा टप्पा साजरा करत आहे. दुसरीकडे, कंगना राणौत या सेलिब्रेशनवर नाराज दिसत आहे. तिला या आकडेवारीवर विश्वास बसत नाही. अभिनेत्री कंगनाने ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांवर चित्रपटाच्या कमाईचे खोटे आकडे जाहीर केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर कंगना राणौतने चित्रपटाचा सहनिर्माता करण जोहरची मुलाखत घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. (Brahmastra collection)
कंगना रणौतने रविवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ब्रह्मास्त्र बद्दल पोस्ट करत रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत चित्रपट हिट झाल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली. कंगनाने लिहिले, "शुक्रवारी आणि रविवारी रिलीज झालेला हा चित्रपट खूप हिट ठरला आहे आणि नफाही कमावला आहे. हा हा हा…. रु. २५० कोटी (तोही एक खोटा आकडा). VFX सह ६५० कोटींचा हा चित्रपट बनवला आहे. प्राईम फोकस सह-निर्माता आहे. याचा अर्थ असा नाही की VFX ची किंमत नाही. गणितज्ज्ञ करण जोहरचे गणित…आपल्यालाही शिकावे लागेल.
पुढच्या पोस्टमध्ये, कंगनाने बॉक्स ऑफिस इंडियाने केलेले ट्विट शेअर केले आणि लिहिले, "हे बॉक्स ऑफिस इंडिया हँडल मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देत आहे. कारण तो माफिया पेरोलवर आहे… आज त्याने ब्रह्मास्त्रला खूप हिट घोषित केले. एका दिवसात, जिथे त्याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत फक्त ६५ कोटी रुपये कमावले होते. त्याने मणिकर्णिका विरुद्ध एक मोठी मोहीम सुरू केली होती आणि फ्लॉप घोषित केली. तसेच धाकडच्या अपयशावर आणि तिकीट विक्रीवरही त्यांनी जोरदार टीका केली. "तुम्ही जे पेरता तेच उगवते. मी येथेच आहे, आता मला हे गणित समजून घ्यायचे आहे. मी गुप्तपणे कट रचत नाही, मी पाठीत वार करत नाही. मी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे आव्हान देते."
कंगनाने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये करण जोहरची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त करताना लिहिले, "मला करण जोहरची मुलाखत घ्यायची आहे आणि समजून घ्यायचे आहे की तो ब्रह्मास्त्रच्या एकूण कलेक्शनची घोषणा का करत आहे? ६५० कोटींचा चित्रपट कसा बनू शकतो. दोन दिवसांत ६० कोटी रुपये जमवून हिट? (हे त्यांनी जाहीर केलेले निव्वळ कलेक्शन आहे, माझा विश्वास नाही) करण जोहर जी कृपया आमचे प्रबोधन करा, कारण मला भीती वाटते की चित्रपट माफियांसाठी निसर्गाचे कायदे वेगळे आहेत आणि माणसांसाठी वेगळे आहेत. आपल्यासारखे."